नाशिक: अवघ्या 6 तासात सोनसाखळी चोरीची उकल

नाशिक (प्रतिनिधी): अवघ्या सहा तासात सोनसाखळी चोरट्याला ताब्यात घेण्यास पंचवटी गुन्हे शोध पथकास यश मिळाले. संशयिताकडून २० हजार ३३० रुपयांची सोनसाखळी हस्तगत करण्यात आली आहे.

याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांना सोनसाखळी चोरटा एकमुखी दत्तमंदिर परिसरात आल्याची माहिती मिळाली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक तहसील कार्यालयातर्फे जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव

त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक रोहित केदार यांच्यासह पथकाने सापळा रचला. चाहूल लागताच संशयितांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पथकाने पाठलाग करून संशयित दीपक राजेंद्र माळी (२४, रा. फुलेनगर, पेठ रोड), यास ताब्यात घेतले.

गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक रोहित केदार, मिथुन परदेशी, महेश नांदुर्डीकर, जयवंत लोणारे, गोसावी, वैभव परदेशी, श्रीकांत कर्पे यांनी कामगिरी बजावली. रविवारी (ता. १३) एक महिला स्नान करत असताना सोनसाखळी जबरीने खेचून नेली होती.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तांत्रिक सल्लागार समितीकडून नाशिकमधील कुंभस्थळांची पाहणी

घटनास्थळावर सहाय्यक निरीक्षक रोहित केदार व कर्मचाऱ्यांनी धाव घेतली होती. परिसरात आजूबाजूला चौकशी केली असता, एक व्हिडिओ प्राप्त झाला व अवघ्या सहा तासात गुन्हा उकल करण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790