Amazon

नाशिक: कपालेश्वर, रामतीर्थाकडे जाणाऱ्या वाहनांना श्रावण मासात ‘नो-एंट्री’

नाशिक (प्रतिनिधी): श्रावणमासानिमित्ताने गंगाघाटावरील पुरातन कपालेश्‍वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते. तसेच, श्रावणातील प्रत्येक सोमवारी आणि शनिवारी परगावचेही भाविक येत असल्याने मंदिर आणि गंगाघाटावर गर्दी होते.

त्यामुळे मंदिराकडे येणारे मार्ग वाहनांसाठी बंद करण्यात आल्याची अधिसूचना शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी जारी केली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मुंबईनाका वाहतूककोंडी फोडण्यासाठी एसटी बसच्या मार्गात बदल; दोन्ही प्रवेशद्वारांचा कायमस्वरूपी वापर

गंगाघाटावरील पुरातन कपालेश्‍वर मंदिराकडे येण्यासाठी मालेगाव स्टॅन्ड, खांदवे सभागृह, ढिकले वाचनालय आणि सरदार चौकाकडून वाहनांसाठी येण्याचे वा जाण्याचे रस्ते आहेत. श्रावण मासानिमित्ताने भाविकांची गर्दी गंगाघाटावरील रामतीर्थ आणि कपालेश्‍वर मंदिरात होत असते.

त्यामुळे भाविक आणि तेथे येणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्‍यता असते. सदर बाब गृहित धरून शहर वाहतूक पोलिस शाखेकडून उपाययोजना करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिटीलिंक बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या २८४ प्रवाशांवर कारवाई; १४ हजारांचा दंड वसूल

त्यानुसार मालेगाव स्टॅन्ड, खांदवे सभागृह, ढिकले वाचनालय व सरदार चौकाकडून येणारे मार्ग हे श्रावण मासातील प्रत्येक सोमवारी व शनिवारी सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत सर्वप्रकारच्या वाहनांसाठी प्रवेश बंद करण्यात आले आहे.

श्रावणमासात २१, २८ ऑगस्ट आणि ४, ११ सप्टेंबर या प्रत्येक सोमवारी आणि १९, २६ ऑगस्ट आणि २, ९ सप्टेंबर या प्रत्येक शनिवारी हे चारही मार्ग वाहतुकीसाठी बंद राहतील, असे आदेश देतानाच, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहनही वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी केले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790