नाशिक: भंगारचा ट्रक घरात घुसून एकजण जखमी

नाशिक (प्रतिनिधी): नानावली भागात ट्रक घरात घुसून दोन घर आणि एक दुचाकीचे नुकसान होऊन एक जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता.११) दुपारी अडीच वाजता घडली.

याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक फरार असून, पोलिस शोध घेत आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेंतर्गत स्व-गणना पत्रक न भरलेल्या मतदारांनी 17 ऑगस्टपर्यंत भरावेत

भंगारचा ट्रक (पीबी- १२- एम- ९८७३) घरात घुसल्याने भीमा गवळी किरकोळ जखमी झाले आहे. श्री. गवळी यांच्या अंगावर पत्रे पडले. लाकडास पत्रे अडकून असल्याने ते बचावले. तर अन्य कुटुंबीय वरच्या मजल्यावर झोपले असल्याने दुर्घटना टळली.

श्रावण गांगुर्डे आणि भीमा गवळी यांच्या घरांचे नुकसान झाले आहे. चालकाचे नियंत्रण सुटले आणि बारा चाकी ट्रक वीज खांब तोडून घरात घुसला. मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: खुनाचा प्रयत्न व दंगा या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला अटक !

ट्रकने दुचाकीला (एमएच- १५- एफजी- २१६५) धडक दिली. त्यात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. भीतीपोटी चालकाने ट्रक सोडून घटनास्थळावरून पळ काढला. श्री. गांगुर्डे यांच्या तक्रारीवरून ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790