सप्तशृंगी गड घाटात भीषण अपघात; बस थेट 400 फूट दरीत कोसळली, एकाचा मृत्यू, 18 जखमी

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या सप्तश्रृंगी गड घाटात बसचा भीषण अपघात झाला असून या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

बस सप्तशृंगी गडावरून खामगावच्या दिशेनं निघाली होती. त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट दरीत कोसळली.

दरम्यान, सप्तश्रृंगी गडावरील स्थानिक रहिवाशी आणि शासकीय यंत्रणांकडून मदतकार्य सुरू झालं आहे. वणी बस अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण 26 प्रवासी असल्याचं समजतंय.

आज (दि. १२ जुलै) सकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी बसचा अपघात झाला. काही जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात तर गंभीर जखमींना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

अपघातग्रस्त बस खामगाव आगाराची असून काल सकाळी 8.30 वाजता ही बस सप्तशृंगी गडाच्या दिशेनं रवाना झाली होती. त्यानंतर बस सप्तशृंगी गडावर रात्री मुक्कामाला होती. त्यानंतर पुन्हा सप्तशृंगी गड ते खामगाव (बुलढाणा) असा बसचा प्रवास सुरू झाला होता.

वणीच्या सप्तशृंगी गडावरून खाली येत असलेल्या बसला मोठा अपघात झाला असून बस थेट 400 फूट दरीत कोसळली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790