नाशिक: आईदेखत 13 वर्षीय मुलाचा नदीत बुडून करुण अंत

नाशिक: आईदेखत 13 वर्षीय मुलाचा नदीत बुडून करुण अंत

नाशिक (प्रतिनिधी): “माझ्या मुलाला वाचवा हो… माझा मुलगा पाण्यात बुडतोय कोणीतरी वाचवा माझ्या दादाला” ,अशी करुन आर्त हाक देणाऱ्या मातेच्या डोळ्यादेखत पोटचा मुलगा नदीत बुडत असतांना आईने मोठयाने हंबरडा फोडला मात्र कुणीही या करुणावत्सल मातेच्या मुलाला वाचवू शकले नाही

अखेर आदित्यचा दारणा नदीत बुडून दुर्दैवी अंत झाला आहे. अशी हृदय हेलावून टाकणारी घटना काल सोमवारी चार वाजता घडली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक डाक विभागामध्ये विमा एजंटांची थेट भरती

गोंदे दुमाला (ता.इगतपुरी)येथील आदित्य वसंत नाठे हा तेरावर्षीय मुलगा आपल्या योगिता नावाच्या आई सोबत कपडे धुण्यासाठी दारणा नदीवर गेला होता सोबत चुलता,चुलती आणि उन्हाळी सुट्टी असल्याने गाडीत बसून तिघे भावंडेही नदीवर आली होती.

दोन दिवसांपूर्वीच मुकणे धरणाचे आवर्तन सोडण्यात आले आहे.नदी तुडूंब भरुन वाहत असल्याने घरातील कपडे धुण्यासाठी नदीकाठावर महिलांची नेहमीच गर्दी असते. घरातील कपडे धुवायचे झाल्यानंतर गाडीही धुतली . कडक उन्हामुळे नदीत आंघोळ करण्याचा मोह त्याला आवरता आला नाही.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिंहस्थापूर्वी निर्माल्य व्यवस्थापनासाठी मंदिर संस्थानांना एकत्र आणणार कुंभमेळा प्राधिकरण

अंघोळ करीत असतांना पाण्याचा अंदाज न आल्याने आदित्य नदीत बुडू लागला. त्याच्यासोबत असलेल्या चुलत भावांनी पाहिले त्यांनी घरच्यांना आवाज दिला तेव्हा आदित्य गटांगळ्या खात होता. आईने खूप आरडाओरडा केला मात्र त्याठिकाणी कोणीही उपस्थित नव्हते.

डोळ्यादेखत मुलगा नदीत बुडत असल्याचे पाहून आईने मोठयाने हंबरडा फोडला मात्र पाण्याच्या प्रवाहात आदित्य खोलवर बुडाला होता. घडलेल्या हृदयद्रावक घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

🔎 हे वाचलं का?:  जिल्ह्यात दोन महत्वाच्या सर्वेक्षणांचा शुभारंभ; रोजगार, बेरोजगारी व असंघटित क्षेत्राची अचूक माहिती होणार संकलित

घटनेनंतर मालेगावहून रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले होते. बराच वेळ शोध घेतल्यानंतरही पाण्याचा प्रवाह आणि अंधार पडत असल्याने रेस्क्यूत अडचण येत असल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली.

सकाळी पुन्हा रेस्क्यू सुरु केल्यानंतर सात वाजता अखेर मृतदेह सापडला. घोटी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790