नाशिक: टोळक्याची बापलेकीस बेदम मारहाण; पंचवटीतील घटना

नाशिक: टोळक्याची बापलेकीस बेदम मारहाण; पंचवटीतील घटना

नाशिक (प्रतिनिधी): वाल्मिकनगर भागात कुरापत काढून चार जणांच्या टोळक्याने बापलेकीस बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत हातातील लोखंडी कड्याने मारहाण करण्यात आल्याने ५२ वर्षीय इसम जखमी झाला आहे. याप्रकरणी गुलाब दादू जाधव (५२ रा.सैलानीबाबा चौक, वाल्मिकनगर) यांनी तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रत्येक महाविद्यालयात स्थापन होणार 'कुंभ कक्ष'; सिंहस्थ २०२७ साठी विद्यार्थी स्वयंसेवकांची नोंदणी सुरू

रविंद्र विठ्ठल पाटील, चेतन रविंद्र पाटील, गोपाल काशिनाथ चौधरी व गणेश दिवे अशी बापलेकीस मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. जाधव व त्यांची मुलगी बुधवारी (दि.१७) आपल्या घरासमोरील ओट्यावर बसलेले असतांना संशयितांनी त्यांना गाठून तुम्ही येथे का राहतात या कारणातून कुरापत काढून वाद घातला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: साधुग्राममधील प्रत्येक सुविधा भाविकांच्या सुरक्षिततेला पूरक ठरावी- विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

यावेळी टोळक्याने शिवीगाळ करीत बापलेकीस मारहाण केली. या मारहाणीत जाधव यांना चौघांपैकी एकाने हातातील लोखंडी कड्याने मारहाण केल्याने ते जखमी झाले असून अधिक तपास हवालदार घुगे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790