नाशिक (प्रतिनिधी): शेतात रोटाव्हेटर मारण्यासाठी जात असलेल्या २३ वर्षीय युवा शेतकऱ्याचा ट्रॅक्टर पलटी होऊन जागेवरच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना खामखेडा येथे घडली आहे.
राकेश दिनेश धोंडगे अशी मृत झालेल्या युवा शेतकऱ्याचे नाव असून महिन्याभरापूर्वी त्याचा विवाह झाला होता. या ह्रदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नाशिक: बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ८ लाखाची खंडणी वसूली
मूळचे निमगोले येथील असलेले धोंडगे कुटुंब पिळकोस शिवारात गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. शनिवारी दि.२२ रोजी अक्षय तृतीयाच्या दिवशी रात्री ९ वाजता दिनेश धोंडगे यांचा मुलगा राकेश हा घरून ट्रॅक्टरवर शेतात रोटाव्हेटर मारण्यासाठी गेला.
खामखेडा येथील शेवाळे वस्तीजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीमध्ये ट्रॅक्टर पलटी होवून त्याखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला . या अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दबलेल्या राकेशला बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमधील प्रशिक्षणार्थी अग्निवीर जवानाचा उष्माघाताने मृत्यू
22 तारखेला राकेशचा वाढदिवस होता. परिसरातील तसेच त्याच्या मित्रमंडळीच काल सकाळपासूनच राकेशच्या वाढदिवसाचे स्टेटस होते. मात्र रात्री दहा वाजता त्याच्या अपघाताचे बातमी समजल्यानंतरच वाढदिवसाच्या दिवशी राकेशच्या श्रद्धांजलीच्या स्टेटसने अनेकांना गलबलून गेले. 18 मार्च रोजी त्याचा विवाह झालेला होता. पण या दुर्दैवी अपघातात त्याचा मृत्यू झाल्याने त्याच्या सुखी संसाराचे इमले रचतानाच स्वप्न कालच्या घटनेने उध्वस्त झाले.
याबाबत देवळा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे,पोलीस नाईक सागर पाटील, पोलीस शिपाई सुरेश कोरडे आदी करत आहे.