Amazon

नाशिक शहरात बुधवारी (दि.१७ जून) रात्री अजून २२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात बुधवारी (दि.१७ जून) रात्री अजून २२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, या आधी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात ३१ रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे बुधवारची कोरोनाबाधीतांची एकूण संख्या ५३ झाली आहे.

🔎 हे वाचलं का?:  सप्तश्रृंगी गड ते नांदुरी रस्ता १ ऑक्टोबरपर्यंत राहणार बंद

बुधवारी रात्री ९.२५ वाजता प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: विष्णू नगर-१, पेठ रोड-२, फुले नगर-२, दिपाली नगर-१, काझीपुरा-२, खोडे नगर-१, पखाल रोड-१, महालक्ष्मी चौक (सातपूर)-३, आझाद चौक-२, पंचवटी-१, कोणार्क नगर-२, नवनाथ नगर-१, गणेशवाडी-१, वडाळा रोड-१, गंजमाळ-१ अशा एकूण २२ रुग्णांचा समावेश आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती सहा आठवड्यांत करा: उच्च न्यायालय; चार महिन्यांची मुदतवाढीची मागणी फेटाळली

तर याआधी बुधवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: वडाळा नाका-१, कोकणीपुरा-१, कामठवाडे-३, थत्ते नगर-१, बोरगड-१, गंजमाळ-१, फुले मार्केट-२, जीपीओ रोड-१, शालीमार-१, रेडक्रॉस-१, विसेमळा-१, उपनगर-१, दुध बाजार-१, मखमलाबाद-१, पेठ रोड-२, नाशिकरोड-१, उपनगर-२, कथडा-१, शिवाजी चौक (सिडको)-१, कोकणीपुरा-२, पेठरोड-१, काठे गल्ली-१, वडाळा रोड-२, अयोध्या कॉलनी-१ अशा एकूण ३१ रुग्णांचा समावेश आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790