नाशिक: दहावीच्या पेपरमध्ये कॉपी करु दिली नाही म्हणून विद्यार्थ्यांची शिक्षकावर दगडफेक

नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशिक: दहावीच्या पेपरमध्ये कॉपी करु दिली नाही म्हणून विद्यार्थ्यांची शिक्षकावर दगडफेक

नाशिक (प्रतिनिधी): इयत्ता दहावीच्या पेपर मध्ये कॉपी करु दिली नाही या रागातून विद्यार्थ्यांनी शिक्षकावर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यात घडली आहे. पेपर सुटल्यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकाला लक्ष्य केले.

दहावीच्या पेपरदरम्यान कॉपी करु न दिल्याने विद्यार्थ्यांनी शिक्षकावर दगडफेक केल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये घडली आहे.

या दगडफेकीत शिक्षकाच्या डोक्याला आणि डोळ्याला मार लागल्याने ते जखमी झाले आहेत. या प्रकरणी मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश दिनकर जाधव असं जखमी शिक्षकाचं नाव आहे.

राज्यात एकीकडे दहावी आणि बारावीच्या परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान राबवलं जात आहे. मात्र दुसरीकडे कॉपी करु न दिल्याने विद्यार्थ्यांकडूनच शिक्षकावर हल्ला होत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. दहावीचा काल (20 मार्च) विज्ञान 2 या विषयाचा पेपर होता.

तुम्हालाही तुमचं स्वत:चं क्रेडिट कार्ड हवंय ? इथे क्लिक करा !

मनमाडमधील एच ए के हायस्कूलमध्ये शिक्षक निलेश दिनकर जाधव यांच्यावर बोर्डाच्या परीक्षेत सुपरव्हिजनचं काम सोपवण्यात आलं होतं. निलेश दिनकर जाधव हे विद्यालयातील कलाशिक्षक आहेत. पेपर दरम्यान परीक्षक असलेल्या निलेश जाधव यांनी कॉपी करु दिली नाही म्हणून विद्यार्थी संतप्त होते. पेपर सुटल्यानंतर सुपरपव्हिजन संपवून निलेश जाधव हे बाहेर पडत असताना, विद्यार्थ्यांमधून काही मुलांनी जाधव यांच्या दिशेने दगडफेक केली. या हल्ल्यात डोक्याला आणि डोळ्याला दगड लागल्यामुळे ते जखमी झाले आहेत. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे जाधव यांचा गोंधळ उडाला. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं.

या घटनेप्रकरणी शिक्षक जाधव यांच्या तक्रारीवरुन मनमाड शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे कॉपीमुक्त अभियानाला शासन गती देत असताना दुसरीकडे मात्र कॉपी करु न दिल्याने शिक्षकावरच हल्ला होत असल्याने ही घटना गंभीर मानली जात आहे. या गंभीर प्रकाराने शहरातील शैक्षणिक क्षेत्रात चिंतेचं वातावरण पसरलं आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790