NC

नाशिक: पंचवटीत अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत २६ वर्षीय दुचाकीस्वार युवक ठार

नाशिक: अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत २६ वर्षीय दुचाकीस्वार युवक ठार

नाशिक (प्रतिनिधी): महामार्गावरील उड्डाणपूलावर भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार झाल्याची घटना घडली.

स्वप्निल सुभाष गुंजाळ (२६ रा.जाधव संकुल,सातपूर अंबड लिंकरोड) असे मृत युवकाचे नाव आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: विश्व मराठी संमेलनानिमित्त दुमदुमली कुसुमाग्रजांची नगरी; शोभायात्रेत विद्यार्थ्यांसह हजारो नागरिकांचा सहभाग

गुंजाळ शनिवारी (दि.११) द्वारकाकडून आडगावच्या दिशेने आपल्या दुचाकीवर एमएच १५ ईवाय ९३२२ उड्डाणपूलावरून प्रवास करीत असतांना हा अपघात झाला.

महामार्गावरील तपोवन क्रासिंग भागातील पंचवटी एसटी डेपो समोर पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीस जोरदार धडक दिली.

या अपघातात जखमी गुंजाळ याचा मृत्यू झाला असून याप्रकरणी त्याचे वडिल सुभाष गुंजाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलिस वाहनासह पसार झालेल्या चालकाचा शोध घेत आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर बारा वर्ष बलात्कार, गुन्हा दाखल
नाशिक: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील काका-पुतण्यांचा मृत्यू

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790