NC

नाशिक: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील काका-पुतण्यांचा मृत्यू

नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशिक: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील काका-पुतण्यांचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील काका पुतण्यांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे…

येथील वणी-पिंपळगाव रस्त्यावरील बोराळे फाट्याजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील (Bike) तिघे जण ठार झाल्याची घटना घडली आहे…

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ २०२७ : ऐतिहासिक ओळख जपून नाशिक-त्र्यंबकेश्वर शहर सुशोभीकरणासाठी आढावा बैठक

याबाबत वणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगाव रस्त्यावर बोराळे फाट्याजवळ मंगळवार (दि.१४) रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास वणीकडून पिंपळगाव बसवंतकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने तीसगांवहून वणीला येणाऱ्या मोटरसायकला जोरदार धडक दिली.

नाशिक: प्रतिष्ठित इन्शुरन्स कंपनीच्या एरिया मॅनेजर विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ २०२७ : ऐतिहासिक ओळख जपून नाशिक-त्र्यंबकेश्वर शहर सुशोभीकरणासाठी आढावा बैठक

या धडकेत मोटरसायकलवरील निवृत्ती सखाराम कराटे वय ५५ वर्षे (काका) केदु यशवंत कराटे वय ३५ वर्षे (पुतण्या) संतोष विष्णू कराटे वय ३३ वर्षे (पुतण्या) सर्व रा. तीसगाव, ता. दिंडोरी या काका-पुतण्यांचा जागीच मृत्यू  झाला. तसेच पोलिस (Police) अज्ञात वाहनाचा शोध घेत असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नाशिक: अशोकस्तंभावर वाहनावरील ताबा सुटून गाडी शिरली मिठाईच्या दुकानात

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790