🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: उपनगरला घरकाम करणाऱ्या महिलेनेच केली दागिन्यांची चोरी

नाशिक: उपनगरला घरकाम करणाऱ्या महिलेनेच केली दागिन्यांची चोरी

नाशिक (प्रतिनिधी): घरकाम करणाऱ्या एका मोलकरणीने आपल्या मालकीणीच्याच घरात चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: रेल्वे लेव्हल क्रॉसिंग व्यवस्थापनासाठी कुंभमेळा प्राधिकरणाकडून संयुक्त सर्वेक्षणांना सुरुवात

मीना मुकुल आगा यांच्या घरी संशयित इंदू संतोष सोनवणे ही महिला मोलकरीण म्हणून काम करते.

मीना यांच्या बेडरूमधील कपाटात एक लाख 65 हजार रुपयांचे दागिने ठेवले होते.

घरात काम करत असताना मोलकरीण इंदू हिने कपाटातील दागिने चोरून नेले असा तिच्यावर आरोप आहे. त्यामध्ये 99 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या तीन अंगठ्या, छत्तीस हजार रुपये किमतीची १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील दोन जोड, 24 हजार रुपये किमतीचे सोन्याची चैन, सहा हजार रुपये किमतीचे दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट, असा ऐवज चोरून नेला. सदर बाब मीना यांच्या लक्षात आल्याने त्यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790