नाशिक: कौटुंबिक वादातून डॉक्टरची गळफास घेत आत्महत्या

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील पंचवटीमधील एका डॉक्टरने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे..
निलेश कुमार पोपटलाल छाजेड असे त्यांचे नाव असून ते नाशिक मधील खाजगी रुग्णालयात प्रॅक्टिस करत होते.
घटना घडली त्यावेळी घरात त्यांची पत्नी होती. त्यांच्या पत्नीला कळताच त्यांनी निलेश छाजेड यांना रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांचा मृत्यू झाला होता.
पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, निलेश कुमार पोपटलाल छाजेड हे पंचवटी परिसरात राहतात. गेल्या आठ वर्षांपासून शहरातील एका खाजगी रुग्णालयात वैद्यकीय सेवा देत होते. सोमवारी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी गळफास लावून घेतला. घरात त्यांच्या पत्नी होत्या त्यांना ही घटना कळताच त्यांनी शेजाराच्याना बोलावून रुग्णालयात नेले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
यानंतर पंचवटी पोलिसांनी कळविण्यात आले. दरम्यान छाजेड यांच्या कुटुंबात काही महिन्यांपासून वाद सुरू होता. यात तणावातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा पंचवटी पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. पोलिसांचा तपास त्या दृष्टीने सुरू आहे. त्यांच्या पश्चात त्यांनी पत्नी आणि दोन मुलं आहेत. दोघंही मूल शिक्षणासाठी बाहेर आहेत.