नाशिक: अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याने लग्न मोडले, तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमधून धक्काददायक प्रकार समोर आला आहे…
शहरातील एका तरुणीवर वारंवार अत्याचार करून अश्लील फोटो नातेवाईकांना शेअर केल्याची घटना घडली आहे.
शिवाय या प्रकारामुळे संबंधित तरुणीचे ठरलेले लग्न मोडले आहे. या प्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक शहरातील नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना उघडकीस आली आहे.
यासंदर्भात नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयिताने तरुणीस विवाहाचे आमिष दाखवुन विविध हॉटेल्स, नाशिक शहरातील राणेनगर येथील हॉटेल्स येथे तरुणीच्या मनाविरूद्ध वारंवार शारिरीक सबंध ठेवण्यात आले. यावेळी तरुणीचे अश्लील फोटो व व्हिडीओ मोबाइर्लमध्ये काढुन पुन्हा पुन्हा शारिरीक सबंधाकरीता वारंवार तगादा लावला.
संशयित हा तरुणीला 2020 पासून ओळखत होता. त्यानंतर ओळखीच्या माध्यमातून संशयिताने तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले. लग्नाचे आमिष दाखवून शहरातील हॉटेल्स, गेस्ट हाऊस आदी ठिकाणी नेऊन तरुणीच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. याचदरम्यान त्याने छुप्या पद्धतीने कॅमेरा लावून अश्लील चित्रण केले. दरम्यान संशयिताने नंतरच्या काळात तरुणीला ब्लॅकमेल करीत वारंवार शारीरिक संबंध ठेवले.
त्यावेळी पीडितेने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर आई-वडिल व नातेवाईकांना पीडितीचे अश्लील फोटो व व्हिडीओ पाठविण्याची धमकी देऊन पुन्हा शारिरीक सबंध ठेवले.
दरम्यान ऑगस्टच्या 28 तारखेला पीडितेच्या साखरपुड्याचा कार्यक्रम असताना संशयिताने तरुणीला कॉल करुन बोलवले. मात्र यावेळी पीडितेने संशयितास नकार दिला. याचा राग येऊन संशयिताने तरुणीच्या व्हॉट्सपवर व बहिण्याच्या नवऱ्यास आणि तिच्या होणाऱ्या पतीला अश्लील फोटो पाठवले. या प्रकाराने तरुणीचे ठरलेले लग्न मोडल्याने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. नाशिकरोड पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र संशयित फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे. अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल केल्यानंतर पीडितेने शारिरीक व मानसिक त्रासाला कंटाळून राहत्या घरी फिनाईल पिऊन जिव संपविण्याचा प्रयत्न केला होता.