नाशिक: सातपूरला बलेनोने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू

नाशिक: बलेनोने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या त्र्यंबक रोडवर मध्यरात्री 12.30 वाजेच्या सुमारास अपघात झाला.

या अपघातात शुभम विजय वासुलकर या तरुणाचा मृत्यू झाला आहे..

रात्री कामावरून घरी जात असताना हा अपघात झाला आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 16 जुलै रोजी आयोजन

अधिक माहिती अशी की, शुभम हा सातपूर येथे आई सोबत राहत होता. त्याच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले आहे.

घरची परिस्थती नाजूक असल्याने शुभमला अर्ध्यातच शिक्षण सोडावे लागले होते. शिक्षण सोडून शुभम नोकरी करत होता. नाशिकच्या टपारिया टूल्स येथे तो कामाला होता.

👉 हे ही वाचा:  पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करणार

रविवारी 3 ते 12 या वेळेत काम करून रात्री स्वतःच्या मोटारसायकलवर घरी निघाला होता. सातपूर मधील उज्वल एजन्सी जवळ रस्ता क्रॉस करत असताना नाशिककडून त्रंबकेश्वरकडे जाणाऱ्या बलेनो गाडीने शुभमच्या मोटार सायकलला धडक दिली. यात शुभमच्या गाडीचा चक्काचूर झाला असून शुभमचा मृत्यू झाला. काम करत असतानाच त्याने हा वर्षी 12 वीची परीक्षा दिली होती. त्याला 95 टक्के गुण मिळाले होते. शुभमच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790