नाशिक: डोक्यात बंदुकीची गोळी झाडून ६० वर्षीय इसमाची आत्महत्या

नाशिक: डोक्यात बंदुकीची गोळी झाडून ६० वर्षीय इसमाची आत्महत्या

नाशिक (प्रतिनिधी): डोक्यात बंदुकीची गोळी झाडत ६० वर्षीय इसमाने आत्महत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे.

आडगाव येथील पार्क साईड इमारतीत (यू विंग फ्लॅट न.२०४) दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

आडगाव शिवारातील हनुमाननगर येथे असलेल्या पार्क साईड इमारतीत राहणाऱ्या रोशनलाल ओमप्रकाश गोयल (60) यांनी शनिवारी (दि.23) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास राहत्या घरात बेडरूममध्ये स्वतःच्या डोक्यात बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तांत्रिक सल्लागार समितीकडून नाशिकमधील कुंभस्थळांची पाहणी

रोषण गोयल हे पत्नी उषा गोयल यांच्यासोबत या फ्लॅटमध्ये वास्तव्यास होते.

गोयल हे मुळचे हरयाणाचे. जानेवारी महिन्यात ते नाशिक येथे वास्तव्यास आले होते. त्यांना एक मुलगा व दोन मुली आहेत. त्यांचा मुलगा सुमित गोयल यांचा कॅरेट बनवण्याचा व्यवसाय आहे. सुमीत हे तीन दिवसांपासून जानोरी येथील फॅक्टरीत होते. त्यांची आई म्हणजेच रोशन गोयल यांची पत्नी उषा यांनी “पप्पा दार उघडत नाहीये आणि काहीतरी आवाज आला..” असे मुलगा सुमित याला सांगितले. त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व दरवाजा तोडला. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: APK फाईल डाऊनलोड करताच व्यावसायिकाची १.६९ लाखांची ऑनलाइन फसवणूक

रोशन गोयल यांना हार्ट प्रॉब्लेम होता असे समजते. आजारपणाला कंटाळून त्यांनी हे टोकाचं पाउल उचललं असल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. घटनेचे वृत्त कळतात घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त गंगाधर सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख पोलीस पथकाने धाव घेतली होती.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790