दुख:द: तिरुपतीला गेलेल्या नाशिकच्या दोन भाविकांचा अपघाती मृत्यू

दुख:द: तिरुपतीला गेलेल्या नाशिकच्या दोन भाविकांचा अपघाती मृत्यू

nashik calling

नाशिक (प्रतिनिधी): तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन येणाऱ्या भाविकांच्या कारला झालेल्या अपघातात दोन भाविक ठार झाले तर सहा जण जखमी झाले.

मृत्यू झालेले दोघेही मित्र भगूर व नानेगावचे असल्याने या गावांवर शोककळा पसरली आहे.

याबाबत वृत्त असे की, सोमवारी (दि. १८) विजयनगर येथून तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी हे दोघे मित्र दोन इनोव्हा कारने गेले होते.

शुक्रवारी पहाटे पाचच्या दरम्यान कर्नाटकमधील दावनगिरीजवळ त्यांची कार चार-पाच वेळा उलटल्याने कारमधील विजय कोरडे (रा. भगूर) व नीलेश आडके (रा. नानेगाव) यांचा जागीच म्रुत्यू झाला तर कारमधील महेश अशोक गिते, प्रवीण साळवे, दीपक धात्रक, ऋतिक केदार, सचिन आव्हाड, आकाश सातपुते हे जखमी झाले. अपघातानंतर कार शेतातील कच्च्या रस्त्यावर जाऊन पडली होती. अपघातानंतर एका जखमीने पुढे गेलेल्या दुसऱ्या कारमधील मित्रांना अपघाताची माहिती दिल्याने ही कार माघारी परतली व त्यातील प्रवाशांनी शाेध घेत अपघातग्रस्त कारमधील जखमींना बाहेर काढून पोलिसांना अपघाताची माहिती दिली. घटनास्थळी पोलिसांनी मदत केल्याने जखमींवर उपचार होऊ शकले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790