नाशिक: कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत अ’ल्प’व’यी’न मुलीवर ब’ला’त्का’र
नाशिक (प्रतिनिधी): कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत एका अल्पवयीन मुलीवर ब’ला’त्का’र करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
१६ व’र्षी’य अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार केल्या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात ब’ला’त्का’र,बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो) कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.
मजहर अन्वर खान (२६ रा.संजीवनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
- नाशिक: पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून आठ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू
- नाशिक: रस्ता खचल्याप्रकरणी महापालिकेची ‘या’ नामांकित बांधकाम व्यावसायिकाला नोटीस
याप्रकरणी चुंचाळे शिवारातील आंबेडकरनगर भागात राहणा-या १६ वर्षीय पीडितेने तक्रार दाखल केली आहे. पीडिता आणि संशयित पूर्वी एकमेकांचे शेजारी राहत होते. २ एप्रिल २०२२ रोजी संशयिताने तिला गाठून कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत त्र्यंबकरोडवरील द ग्रेपसिटी या हॉटेलमध्ये नेले. याठिकाणी त्याने तिच्यावर बळजबरीने ब’ला’त्का’र केला. यानंतरही वेळोवेळी धमकी देत त्याने अत्याचार सुरूच ठेवल्याने मुलीने आपबिती कुटुंबियांकडे कथन केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून, संशयितास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सचिन पवार करीत आहेत.