Heavy Rain Alert: नाशिक जिल्ह्यात १४ जुलै पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा…

Heavy Rain Alert: नाशिक जिल्ह्यात १४ जुलै पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा…

नाशिक (प्रतिनिधी): पालघर आणि पुणेसह नाशिक जिल्ह्यात ११ ते १४ जुलै 2022 दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे.

त्यामुळे नदीकाठच्या गावांना अलर्ट करण्यात आले आहे.

नाशिक शहरासोबत जिल्ह्यात पावसाचे जोरदार आगमन झाले आहे.

जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात धुव्वाधार पाऊस सुरू आहे.

धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने नद्याही दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी पुरपरिस्थीती निर्माण झाली असून नदी- नाल्यांवरील पुल पाण्याखाली गेले आहेत. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धुव्वाधार पावसाची जोरदार बॅटींग सुरू असल्याने धरणांतून मोठ्याप्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. अनेक ठिकाणी पुरपरिस्थीती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील ४ महत्वाच्या धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने मुख्य नद्यांसह उप नद्यांना पुर आले आहेत. नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. संततधार बरसणाऱ्या पावसामुळे नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. अनेक ठिकाणी पुरपरिस्थीती निर्माण झाली. महाराष्ट्र- गुजरातला जोडणारा नार नदीवरील पूल पाण्याखाली गेला.

दिंडोरी तालुक्यातील ६ ते ७ रस्ते पाण्याखाली गेले असून अनेक गावांचा संपर्क यामुळे तुटला आहे. त्र्यंबकेश्वर, देवळा आणि निफाड तालुक्यात प्रत्येकी १ पुल पाण्याखाली गेल्याने नागरिकांपुढे मोठ्या समस्या उभ्या ठाकल्या आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790