संतापजनक: नाशिकला अमावस्येच्या दिवशी मानसिक रुग्णाचे हातपाय बांधून अघोरी पूजेचा प्रयत्न

संतापजनक: नाशिकला अमावस्येच्या दिवशी मानसिक रुग्णाचे हातपाय बांधून अघोरी पूजेचा प्रयत्न

नाशिक (प्रतिनिधी): शरीर जसे आजारी पडते तसे मनही आजारी पडू शकते.

त्यामुळे रुग्णास साखळदंड , बेडी अथवा दोरात बांधून देवस्थानी ठेवत अघोरी कृत्य करणे योग्य नाही.

तर त्यास मानसोपचार तज्ञाची गरज असते. मात्र नाशिकमध्ये भगताच्या माध्यमातून असे उपचार गोदावरी काठी सर्रास केलं जातायत विशेषतः अमावस्येच्या दिवशी हे प्रकार होतात.

नाशिक जिल्ह्यातील निफाड भागात असाच एक प्रकार उघड झाला…

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ २०२७ पूर्वी कुशावर्त कुंडासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10928,10925,10917″]

निफाड तालुक्यातील धानोरे येथील एका मानसिक रुग्णाचे हातपाय बांधून त्याची अघोरी पूजा करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, स्थानिक गावकरी व अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना माहिती मिळताच त्यांनी या युवकाचे व कुटुंबीयांचे समुपदेशन करून हा प्रकार रोखण्यात आल्याचा दावा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केला. रात्री उशिरापर्यंत लासलगाव पोलिसात यासंदर्भात काेणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ २०२७ पूर्वी कुशावर्त कुंडासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प

याबाबत शिरवाडे (वाकद) येथील नागरिकांकडून माहिती मिळाली असून धानोरे येथील पिडीत मानसिक आजाराने त्रस्त असल्याने नातेवाईकांनी त्याला अनेक देवस्थानी ठेवले. पायात लोखंडी बेडी घातली. परंतु, फरक पडत हाेत नव्हता. शिरवाडे (वाकद) येथील एका भगताने त्यांना अघोरी पूजा करण्यास सांगितली. त्यासाठी गोदावरी नदीत आंघोळ घालून अघोरी पूजा करण्यात येणार होती. मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास नातेवाईक व संबंधित भगत मोर्विस येथे आले. नदीकाठी एकांतात सर्व जमा झाले. गावकऱ्यांना हे संशयास्पद वाटल्याने ते तिथे गेले असता हा प्रकार समोर आला.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ २०२७ पूर्वी कुशावर्त कुंडासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प

मोर्विसचे पोलिस पाटील सोमनाथ पारखे, गोरख कोकाटे यांनी अंनिसचे कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांना याबाबत माहिती दिली. चांदगुडे यांनी हा जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा असल्याचे नातेवाईकांना सांगितले. पिडीतास मानसिक आजार असल्याने अघोरी पूजेपेक्षा डाॅक्टरांची गरज असल्याचे सांगितले. गावकऱ्यांनी पिडीतास दोरातुन मुक्त करत पोलिसांना घटनेची माहिती दिली. संबंधित भगतावर कारवाई करण्याची मागणी केली. रात्री उशिरापर्यंत लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा झाला नव्हता.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790