Amazon

Breaking: नाशिकला सिव्हील हॉस्पिटलच्या आवारात प्रशिक्षणार्थी परिचारिकेची आत्महत्या…

Breaking: नाशिकला सिव्हील हॉस्पिटलच्या आवारात प्रशिक्षणार्थी परिचारिकेची आत्महत्या…

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातून बुधवारी (दि. १५ जून) धक्कादायक घटना समोर आली आहे.

सिव्हील हॉस्पिटलच्या आवारात प्रशिक्षणार्थी परिचारिकेने आत्महत्या केली आहे.

शहरातील त्र्यंबकरोड लगत असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात प्रशिक्षणार्थी परिचारिकेने आत्महत्या केली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिटीलिंक बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या २८४ प्रवाशांवर कारवाई; १४ हजारांचा दंड वसूल

आज सकाळच्या सुमारास ही बाब उघडकीस आली आहे.

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10925,10922,10917″]

माधुरी काशिनाथ टोपले (१८, रा. वांगण सुळे, ता. सुरगाणा) असे आत्महत्या केलेल्या प्रशिक्षणार्थी परिचारिकेचे नाव आहे. सिव्हिल हॉस्पिटल लगतच असलेल्या परिचारिका महाविद्यालयात ती शिक्षण घेत होती. या महाविद्यालयालगतच मुलींचे वसतीगृह आहे. तेथे ती राहत होती. रात्रीच्या सुमारास तिने आपल्या राहत्या रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात येत आहे. पोलिस घटनास्थळी पोहचले असून तिच्या रुममधील वस्तूंची तपासणी केली जात आहे. तिने काही चिठ्ठी लिहून ठेवली आहे का, तिचा मोबाईल आणि अन्य बाबींची पडताळणी सुरू आहे. या घटनेमुळे वसतीगृहातील विद्यार्थिनींमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिस तपास सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790