Amazon

दुर्दैवी: नाशिकमधील पाटील दाम्पत्याचा अमेरिकेत अपघाती मृत्यू

Shops. Office Space On Rent At Canada Corner, Nashik. Click here

दुर्दैवी: नाशिकमधील पाटील दाम्पत्याचा अमेरिकेत अपघाती मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक इंडीयन मेडीकल असेासिएशनच्या अध्यक्षा डॉ राजश्री पाटील यांचे सुपुत्र पृथ्वीराज (वय ३२) सह सुन सावनी (वय: ३०) या दोघांचा अमेरिकेत अपघाती मृत्यू झाला.

चारच महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या पृथ्वीराज व डॉ. सावनी पाटील यांचा विवाह झाला होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मुंबईनाका वाहतूककोंडी फोडण्यासाठी एसटी बसच्या मार्गात बदल; दोन्ही प्रवेशद्वारांचा कायमस्वरूपी वापर

दोघेही अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे वास्तव्यास होते.

रविवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या मर्सिडीज बेन्झ कारला भीषण अपघात झाला. त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नाशिकमध्ये या घटनेची माहिती मिळताच डॉ. राजश्री पाटील आणि त्यांचे कुटुंबीय तातडीने अमेरिकेला रवाना झाले.

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10767,10770,10772″]

डॉ. राजश्री पाटील यांचे एकुलते एक पुत्र पृथ्वीराज हे सॉफ्टवेअर इंजिनिअर तर सावनी या डॉक्टर होत्या. सांताक्लारा येथे ते रहात होते. चारच महिन्यांपूर्वी, डिसेंबर २०२१ मध्ये त्यांचा विवाह अमेरिकेतच झाला होता. रविवारी पहाटे कॅलिफोर्नियातील महामार्ग क्रमांक २९ वरील सोस्कोल फेरीरोड येथे हा अपघात घडला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढणार; सोमवारी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट

यात पाटील यांची कार झाडाला धडकली. या कारला मागून येणाऱ्या दुसऱ्या कारने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, मागील कारने धडक दिल्यानंतर पृथ्वीराज यांची मर्सिडीज बेन्झ (सी ३००) ही कार हवेत उडून अंडरपास रोड वेवरून विरुद्ध बाजूच्या तटबंदीवर आदळून कारने पेट घेतला. तेथील अग्निशमन यंत्रणेने आग विझविली. अपघातानंतर सोस्कल फेरीरोड बंद करण्यात आला होता. पाटील दाम्पत्याची ओळख पटवण्यात पोलिसांना वेळ लागला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिटीलिंक बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या २८४ प्रवाशांवर कारवाई; १४ हजारांचा दंड वसूल

अपघातानंतर दुसऱ्या दिवशी डॉ. राजश्री पाटील यांना माहिती देण्यात आली. यानंतर पाटील कुटुंबीय मंगळवारी अमेरिकेला रवाना झाले आहेत. पृथ्वीराज व सावनी यांच्यावर कॅलिफोर्नियातच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790