Amazon

नाशिक: ग्राहकांच्या सोयीसाठी शनिवार व रविवारी वीजबिल भरणा केंद्र सुरु

नाशिक: ग्राहकांच्या सोयीसाठी शनिवार व रविवारी वीजबिल भरणा केंद्र सुरु

नाशिक (प्रतिनिधी): ग्राहकांना वीजबिल भरणा अधिक सुलभ व्हावा, यासाठी शनिवार (२१ मे) व रविवारी (२२ मे) वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्याचे निर्देश कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिले आहेत.

त्यानुसार कोकण प्रादेशिक विभागातील इतर परिमंडलासह नाशिक परिमंडलांतील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महावितरणचे योगदान; मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ३.६८ कोटी रुपयांची मदत !

ही उपलब्ध सुविधा तसेच डिजिटल माध्यमांद्वारे ग्राहकांनी आपल्या चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करण्याचे महावितरणने केले आहे.

अधिकृत वीजबिल भरणा केंद्राशिवाय महावितरणच्या मोबाईल ॲप (App) वर वीजबिल भरणा तसेच इतर सर्व सुविधा हाताच्या बोटावर उपलब्ध आहेत. www.mahadiscom.in या संकेतस्थळावर केवळ बारा अंकी ग्राहक क्रमांक नमूद करून नेट बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आदींच्या माध्यमातून सुरक्षित व सुलभपणे वीजबिल भरता येते.

🔎 हे वाचलं का?:  दिवाळी-भाऊबीजेसाठी रेल्वेचा दिलासा; भुसावळ-देवळालीदरम्यान दोन दिवस विशेष मेमू

याशिवाय विविध पेमेंट वॉलेटचा (पेटीएम, गूगल पे) उपयोग करून घरबसल्या वीजबिलाचा ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा आहे. तसेच वीजबिलावर दिलेला क्यूआर कोड स्कॅन करूनही थेट पेमेंट गेटवेवर जाऊन वीजबिल भरणे सुलभ होते. अखंडित वीज सेवेसाठी उपलब्ध सुविधांचा उपयोग करून चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790