म्हसरूळला टवाळखोरांचा माज: भर रस्त्यात अडवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

म्हसरूळला टवाळखोरांचा माज: भर रस्त्यात अडवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात रोडरोमिओंची दहशत वाढत चालली आहे.

भर रस्त्यात मुलींची छेड काढण्याचे प्रकार सुरु आहेत.

अशा रोडरोमिओंवर पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जलवाहिनी फुटली; नाशिक शहरातील 'या' भागांत आज (दि. २६) पाणीपुरवठा बंद राहणार

रस्त्याने जाणार्‍या मुलीला अडवून तिचा विनयभंग करणार्‍या तीन जणाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी ही तिच्या मैत्रिणीसह रस्त्याने जात होती. त्यावेळी पीडितेच्या भावाच्या ओळखीच्या तीन आरोपींनी या मुलीला रस्त्यात अडविले. त्यातील एकाने “तू खूप छान दिसतेस,” तसेच “ओठांना एवढी लिपस्टिक का लावलीस,” असे विचारले, तर इतर दोघांनी तिचे दोन्ही हात पकडून गालाला स्पर्श करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. पीडितेने आरोपींच्या हाताला झटका देत सुटका केली. त्यानंतर “मी माझ्या भावाला बोलावते,” असे पीडित मुलगी म्हणाली असता आरोपींनी “कोणाला बोलवायचे आहे, त्याला बोलाव, आम्ही कोणाला घाबरत नाही,” असा दम दिला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: यूएसडीटी गुंतवणुकीच्या नावाखाली 19 लाखांची ऑनलाईन फसवणूक

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10494,10491,10488″]

दरम्यान या प्रकाराने भेदरलेल्या मुलीने म्हसरूळ पोलीस ठाण्यात तिघा आरोपींविरुद्ध विनयभंगाची फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चतुर करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790