नाशिक: मागील भांडणाची कुरापत; बिअरची बाटली डोक्यात मारल्याने युवक जखमी
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढतांना दिसतंय.
थोड्या थोड्या कारणांवरून युवकांमध्ये हाणामारी होण्याचे प्रकार वाढलेत.
अशीच एक घटना कालिदास कलामंदिरासमोर घडली आहे.
मागील भांडणाची कुरापत काढून डोक्यात बिअरची बाटली मारून युवकाला जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी गोकुळ ऊर्फ रोहित ब्रिजलाल केशरवाणी (वय २१, रा. शिवशक्ती चौक, सिडको) हा युवक दि. २ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता कालिदास कलामंदिरासमोरील रस्त्याने रिक्षाने जात होता. ही रिक्षा आरोपी सचिन पवन आहेर (पत्ता माहीत नाही) याने अडवून केशरवाणी याला मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ केली. तसेच बिअरची बाटली फिर्यादीच्या डोक्यात मारून जड हत्याराने दुखापत केली. दरम्यान या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात सचिन आहेरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक आहेर करीत आहेत.
- नाशिक: सिटीलिंकसाठी आता ९ महिला तिकीट तपासनीस आणि १० महिला वाहक
- महसूल अधिकारी आरडीएक्स + दंडाधिकारी डिटोनेटर = जिवंत बॉम्ब: दीपक पांडेय