नाशिक: पाच वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष देत तिचा विनयभंग, आरोपीला 3 वर्षे शिक्षा

नाशिक (प्रतिनिधी): पाच वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष देत तिचा विनयभंग केल्याच्या गुन्ह्यात आरोपीला ३ वर्षे सश्रम कारावासची शिक्षा ठोठवण्यात आली.

मंगळवारी (दि. १८) विशेष व अतिरिक्त सत्र न्यायाधिश एस. एस. खरात यांनी ही शिक्षा ठोठावली. अब्दुल हुसेन शेख (४०) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

अभियोग कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, ४ जानेवारी २०२२ रोजी जयभवानी रोड येथे एका सोसायटीच्या कंपाउंडमध्ये हा प्रकार घडला होता.

हे ही वाचा:  नाशिक: सणांच्या पार्श्वभूमीवर ६२१ सराईत गुन्हेगारांवर कारवाई, ११ स्थानबद्ध

आरोपी अब्दुल शेखने पीडित मुलीचा पार्किंगमध्ये विनयभंग केला होता. पीडितेच्या आईच्या तक्रारीनुसार उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन उपनिरीनक्षक विकास लोंढे यांनी आरोपीच्या विरोधात सबळ पुरावे गोळा करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

न्यायालयाने आरोपीच्या विरोधात सादर केलेल्या पुराव्यास अनुसरून ३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अपर्णा पाटील, विद्या चव्हाण यांनी काम पाहिले. पैरवी पी. व्ही. पाटील, के. के. गायकवाड यांनी पाठपुरावा केला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790