सिडकोमध्ये गुंडांची दह’शत: पायी जाणाऱ्याला दोघांकडून मा’र’हा’ण; प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद
जयेश साबळे, महाराष्ट्र एक्सप्रेस ग्रुप, नाशिक
सिडकोत परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारी डोकं वर काढत असल्याचे चित्र आता पाहायला मिळत आहे. सिडको भागात गुन्हेगारांच्या मनात पोलिसांचा धाकच राहिला नाहीये की काय असा सवाल आता नागरिक करत आहे. त्याला कारण म्हणजे सिडको भागात छोट्या-मोठ्या टवाळखोर गुंडांकडून आपली दह’शत माजवण्याचे प्रकार सर्रासपणे समोर येताना दिसताहेत.
एकीकडे नाशिक पोलिस आयुक्त हे नाशिक शहराला गुन्हेगारी मुक्त, भूमाफिया मुक्त करण्याच्या प्रयत्नात असताना दुसरीकडे सिडको भागात मात्र सर्वसामान्यांना मोकळं फिरणं देखील आता मुश्किल झाले आहे. काल सायंकाळी सहा- साडेसहा वाजेच्या सुमारास अज्ञात दोन युवकांनी उत्तम नगर परिसरामध्ये येत रस्त्यावरील येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ केली.
तसेच उत्तम नगर आणि पवन नगर परिसरात जोरदार गाडी चालवत येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये दह’शत पसरविण्याच्या उद्देशाने शिवीगाळ केली. एवढ्यावर न थांबता या गुंडांनी काही वेळातच राजरत्न नगर येथे आपल्या घरी पायी जात असलेल्या स्वप्नील चंद्रकांत पंगे यांना दोन तरुणांनी विनाकारण बेद’म मा’र’हा’ण केल्याची घटना समोर आली. हे सर्व होत असताना पोलिस करत काय होते असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे. दरम्यान पंगे यांना विनाकारण मारहाण झाल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
पोलिसांनी वेळीच जर पाऊले उचलली नाही तर पुन्हा एकदा एखादी गुंड प्रवृत्तीच्या लोकांची टोळी सक्रिय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात याबाबत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, अंबड पोलिस अधिक तपास करत आहेत.
तर शहर पोलिस आयुक्तांकडून सिडको भागात देखील जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. टवाळखोरी, मा’र’हा’ण, खू’न, अशा घटनांसोबतच अवैध धंद्यांचं ठिकाण म्हणून देखिल सिडको भागाची ओळख निर्माण होत चालली आहे. मटका, जुगार, दिवसाला शेकडो घरघुती गॅस सिलेंडरच्या टाक्यांचा होणारा काळाबाजार असे अनेक अवैध धंदे सिडको भागात सर्रास सुरू आहेत, नेमकं कुणाच्या आशीर्वादाने हे सर्व अवैध धंदे सुरू आहे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. कामगार वस्तीचा भाग म्हणून ओळख असलेल्या सिडकोची अवैध धंदे व गुन्हेगारीचा परिसर म्हणून ओळख निर्माण होऊ नये यासाठी शहर पोलिसांनी ताबडतोब कारवाई करण्याची गरज आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. २५ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
महत्वाची बातमी: नाशिक शहरात गुरुवारी (दि. २६ ऑगस्ट) या ठिकाणी होणार लसीकरण
छगन भुजबळांची १०० कोटींची संपत्ती जप्त ?