नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
विद्यार्थ्यांनो! बारावीच्या परीक्षेला मोबाईल घेऊन जात असाल तर ही बातमी वाचा, नाशिकमध्ये काय घडलं?
नाशिक (प्रतिनिधी): बारावीचा इंग्रजीचा पहिलाच पेपर देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे दुचाकीच्या डिक्कीत आणि बाहेर बॅगमध्ये ठेवलेले तब्बल अकरा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये मंगळवारी घडली आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून या प्रकरणात उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बारावीला परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेला येताना सोबत मोबाईल आणू नये असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
नाशिकसह राज्यभरात बारावीच्या परीक्षेला सुरवात झाली असून मंगळवारी इंग्रजीचा पेपर झाला. इंग्रजी विषयाचा पहिला पेपर सकाळी 11 वाजता असल्याने बिटको महाविद्यालय, के. जी. मेहता हायस्कूल, जयरामभाई स्कूल येथे पेपर देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयाकडून त्यांच्या बॅग आतमध्ये नेण्यास मज्जाव करण्यात आला.
नाशिक: साप चावला तरीही ती स्कुटीवर रुग्णालयात आली, मात्र; आईसमोर 17 वर्षीय मुलीचा मृत्यू
त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी त्यांचे मोबाईल बॅगमध्ये ठेवून ती बॅग दुचाकीच्या डिक्कीत ठेवली. तर काही विद्यार्थ्यांनी वह्या पुस्तके व मोबाईल असलेली बॅग शाळा, महाविद्यालयाच्या बाहेर ठेवली; मात्र दुपारी दोन वाजता पेपर सुटल्यानंतर विद्यार्थी बॅगा व दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली बॅग घेण्यासाठी गेले. त्यावेळी मोबाईल चोरीस गेल्याचे लक्षात आले.
Get Your Own Axis Bank Privilege Credit Card
दरम्यान ही घटना नाशिक शहरातील नावाजलेल्या नाशिकरोड परिसरातील बिटको महाविद्यालय, के. जी. मेहता हायस्कूल, जयरामभाई स्कूलमध्ये परीक्षा देण्यासाठी आलेल्या अकरा विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडली आहे. या विद्यार्थ्यांनी मोबाईल चोरी प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
नाशिक: होंडा सिटी कारची मोटरसायकला धडक; 1 ठार, 1 जखमी
त्यानुसार पोलिसांनी मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल केला असला तरी या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे शाळा, महाविद्यालयाचे सुरक्षारक्षक बाहेर असतानाही चोरट्यांनी 11 मोबाईलची चोरी केली. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
नाशिक: लाकडी दांडक्याने मारून पत्नीचा खून; शवविच्छेदनामुळे संशयित पतीचा बनाव उघड
विद्यार्थ्यांना मोबाईल चोरीचा फटका:
बदलत्या काळानुरूप आधुनिक युगात मोबाईल ही सर्वाधिक गरजेची गोष्ट बनली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सोबत मोबाईल बाळगणे स्वाभाविक आहे; मात्र शाळा महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर बॅग ठेवण्यास सांगितले असते तर त्यांचे मोबाईल चोरीला जाण्यापासून वाचू शकले असते, असे पालकांचे मत आहे.. परंतु थेट शाळा, महाविद्यालय बाहेर बॅगा ठेवण्यास सांगितल्याने विद्यार्थ्यांना मोबाईल चोरीचा फटका बसला आहे.