बारा जणांचा बळी घेणारा ‘ब्लॅक स्पॉट’ झाला ट्रॅफिक फ्रेंडली, गतिरोधक, रंबल स्ट्रीपसह पॅचअप वर्क

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा !

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील हॉटेल मिर्ची चौकात अनेक सुधारणा केल्या जात आहेत.

नुकत्याच झालेल्या बस अपघाताच्या पार्श्वभूमिवर मनपाच्या बांधकाम विभागाने ऑक्टोबर रोजी गतिरोधक आणि खडखडाट पट्टीची (रंबल स्ट्रीप) बसविली आहे.

तपोवन बाजुकडून मिर्ची चौक सिग्नल येथील डाव्या बाजुच्या रस्त्याच्या फॅनिंगचे काम सुरु करण्यात आले आहे.

उर्वरीत तीन बाजुंच्या फॅनिंगची कामे करण्यासाठी फॅनिंगमधील अनधिकृत व अतिक्रमित बांधकामे व शेड काढणेसाठी नगरनियोजन व अतिक्रमण विभागामार्फत नोटीसा बजावण्यात आल्या आहेत, त्यातील काही लोकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढुन घेण्यास सुरुवात केली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २२ ते १ ऑगस्ट दरम्यानविशेष आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिर

दरम्यान नाशिक बस अपघातानंतर यंत्रणा कार्यान्वित झाली असून चौफुलीनजीक असलेल्या अतिक्रमित दुकानांवर कारवाई करण्यात येत आहेत. यामध्ये जे स्वतःहून अशी बांधकामे काढून घेणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. नाशिक महानगरपालिकेमार्फत तत्काळ उपाययोजने अंतर्गत रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. खड्डे बुजवण्यात आले आहेत, पॅच वर्क करण्यात आले आहे.

या चौकात येणारी वाहनांचा वेग मर्यादित होण्याच्या दृष्टीने औरंगाबाद रोडला जाऊन मिळणारा मनपाच्या रस्त्यावर गतिरोधक, रंबलर उभारण्यात येऊन अपघात प्रवण क्षेत्र आणि गतीरोधकाचा फलक लावण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आर्थिक विवंचनेतून पत्नी व सात वर्षीय मुलाची हत्या; पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

नाशिक महापालिकेचे शहर अभियंता शिवकुमार वंजारी आणि कार्यकारी अभियंता संदेश शिंदे यांनी या सर्व कामांची पाहणी केली. लवकरच येथील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. रस्त्यावर दुभाजकही बांधला जाणार असून महावितरण अधिका-यांनी डीपी बसवण्याबाबत पाहणी केली. नाशिक मनपाच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी मंगळवारी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा केली होती. नांदूर नाक्यावरुन येणा-या महामार्गाच्या बाजूला सिग्नजवळचे विद्युत रोहित्र हटवण्याबाबत अधिकाऱ्यांनी अनुकूलता दर्शविली आहे. तसेच अतिउच्च दाबाच्या वीज वाहिन्या भूमिगत करण्याबाबतही निर्णय घेतला जाणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ २०२७ : घाटांची कामे मार्च २०२७ पूर्वी दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश

इतर चौकांमध्येही सुधारणा होणार :
महत्वाची बाब म्हणजे मिर्ची चौकाच्या धर्तीवर नांदूर नाका आणि सिद्धिविनायक लॉन्स चौकातही सुधारणा केली जाणार आहे. शहरातील इतर ब्लॅक स्पॉटबाबतही लवकरच कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली आहे. दुसरीकडे नाशिक रोड विभागात बीएम मटेरीअलने रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच वीर सावरकर उड्डाणपूलवरही खड्डे बुजवून पॅच वर्क करण्यात आले आहे. एम. जी. रोडवरही खडी-डांबर टाकून (एमपीएम) खड्डे बुजवण्यात आले आहेत. आयुक्तांच्या निर्देशानुसार शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ते दुरुस्तीची कामे दर्जेदार होतील याची काटेकोरपणे दक्षता घेतली जात आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790