पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या माध्यमातून नागरिकांसह पोलिसांना सुद्धा मिळणार न्याय !
नाशिक (प्रतिनिधी): पोलिस तक्रार प्राधिकरणाची २०२१४ मध्ये स्थापना करण्यात आली असून या प्राधिकरणाच्या माध्यमातून स्वतंत्र्यरित्या पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्याविरुद्ध असलेल्या तक्रारींची चौकशी केली जाणार आहे. याद्वारे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुनावणी घेण्यात येणार असून, नैसर्गिक न्याय तत्वांच्या आधारे तक्रारीची निरसन केले जाणार आहे. या प्राधिकरणाकडे पीडित व्यक्ती, त्याचे कुटुंबीय अथवा पीडित व्यक्तीच्या वतीने कोणीही व्यक्ती राष्ट्रीय व मानवी हक्क आयोग तसेच पोलिस कर्मचारी यांनादेखील पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार करता येणार आहे.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”8224,8246,8248″]
प्राधिकरणाच्या नियमानुसार तक्रार मराठी, हिंदी, इंग्रजी, भाषेत लेखी स्वरूपात करावी. त्यासोबत स्वसाक्षांकीत घोषणापत्र व तक्रारीच्या संदर्भात पुरावे सादर करावे. तक्रार घटना घडल्यापासून एक वर्षाच्या आत करणे आवश्यक असणार आहे. मोघम स्वरूपाच्या, निनावी, खोट्या, नावाने आणि क्षुल्लक व अवाचनीय तक्रारींची दखल घेतली जाणार नाही. ती ग्राह्य धरली जाणार नाही. तक्रारदार तक्रार प्राधिकरणाच्या कार्यालयात पोस्टाने कुरिअरने अथवा इ-मेलद्वारे अथवा व्यक्तिश: भेटून सादर करता येणार आहे. प्राधिकरण पूर्णकालिक तत्त्वावर काम करते. त्यास दिवाणी प्रक्रिया संहिता १९०८ खाली दिवाणी न्यायालयाचे अधिकार देण्यात आले आहे.
याविरुद्ध करता येणार तक्रार:
पोलिस कर्मचारी अधिकारी यांच्याविरोधात पोलिस कोठडीत मृत्यू, गंभीर दुखापत, महिलांबाबतचे गुन्हे, अपमानास्पद वागणूक, विहित केलेल्या कार्यपद्धती न अनुसरता केलेली अटक अथवा स्थानबद्धता अटक केलेल्या व्यक्तीची माहिती नातेवाइकांना न देणे चुकीच्या पद्धतीने अटक करणे, अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करणे, भ्रष्टाचार, खंडणी उकळणे, जमीन अथवा घर बळकावणे, तसेच ज्यामध्ये कायद्याच्या कोणत्याही तरतुदीमध्ये गंभीर उल्लंघन किंवा कायदेशीर अधिकाराच्या दुरुपयोगाचा अंतर्भाव असेल अशी कोणतीही बाब दखलपात्र गुन्ह्यांची नोंद घेण्यास नकार देणे, टाळाटाळ करणे, विलंब करणे, गुन्ह्याचे स्वरूप बदलणे, चुकीच्या पद्धतीने तपास करणे याबाबत प्राधिकरणाकडे दाद मागता येणार आहे.
या ठिकाणी करता येणार तक्रार:
शहरात विभागीय कार्यालय विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरण कार्यालय, अजय पॅलेस, पौर्णिमा स्टाॅप, द्वारका, काठे गल्ली, नाशिक येथे आहे. कार्यालयाचा दूरध्वनी नंबर ०२५३- २५९४०१६ इ-मेल dpca2019@gmail.com वर संपर्क साधण्याचे सेवानिवृत्त पोलिस महानिरीक्षक श्यामराव दिघावकर यांनी आवाहन केले आहे.