Amazon

नाशिक: ह्या कारणामुळे पत्नीने कानशिलात लगावल्याने पत्नीवर चाकूने हल्ला, नंतर स्वत:वरही वार…

नाशिक: पत्नीने कानशिलात लगावल्याने पतीचा पत्नीवर चाकूने हल्ला, नंतर स्वत:वरही वार…

नाशिक (प्रतिनिधी): पतीच्या कानशिलात लगावल्याने पतीने पत्नीवर चाकूने हल्ला केला.

यानंतर पतीने स्वतःवर सुद्धा वार केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे.

याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोघं पती पत्नी दीपाली कुऱ्हाडे आणि बाळू कुऱ्हाडे यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पत्नीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी डॉ. नीलेश जेजुरकर पोलिसांच्या ताब्यात

अधिक माहिती अशी की,  दीपाली कुऱ्हाडे वय 30 वर्ष आणि बाळू कुऱ्हाडे वय ३३ वर्ष, हे त्यांच्या मुलासोबत अहमदनगर जिह्यातील गोंदेगाव येथे राहतात.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मुंबईनाका वाहतूककोंडी फोडण्यासाठी एसटी बसच्या मार्गात बदल; दोन्ही प्रवेशद्वारांचा कायमस्वरूपी वापर

काही दिवसांपूर्वी दीपाली कुऱ्हाडे त्यांच्या माहेरी नाशिक येथील चुंचाळे येथे आले होते.त्यांचे पती बाळू सुद्धा सोबत होते. गुरुवारी (दि.२) बाळू यांनी चेष्टामस्करीत चारचौघात आपल्या पत्नीच्या अंगावर हात ठेवल्याने ही घटना घडली. माहेरच्या लोकांसमोर पतीने अंगावर हात टाकल्याने पत्नीने मागचा पुढचा विचार न करता थेट आपल्या पतीच्या कानशिलेत वाजविली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एफडीएकडून ४८ लाखांचा फ्राइड कांदा आणि तेलाचा साठा जप्त

त्यामुळे संतप्त झालेल्या पतीने पत्नीस शिवीगाळ व मारहाण करीत किचनमधील धारदार चाकूने हल्ला केला. यावेळी त्याने पत्नीच्या गळ्यावर व कानावर सपासप वार केले यानंतर त्याने स्वतःच्याही गळ्यावर चाकू मारून दुखापत करून घेतले. जखमी दाम्पत्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात पती विरूध्द मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790