नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): बांगलादेशमधील हिंदूवरील अत्याचार आणि मंदिरामधील मोडतोडीच्या निषेधार्थ नाशिकमध्ये शुक्रवारी बंदची हाक देण्यात आली. सकल हिंदू समाजातर्फे काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान काही काळ तणाव निर्माण झाला होता. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून शहरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच यावेळी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील केले जात आहे.
आज सकाळपासून नाशिक जिल्हयात हा बंद शांततेत सुरु आहे. किरकोळ घटना वगळात बंद शांततेत सुरु आहे. सर्व व्यावसायिकांनी या बंदला पाठिंबा दिल्यामुळे हा बंद यशस्वी झाला. नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाने बंद दरम्यान मोर्चाही काढला.
बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे. यादरम्यान हिंदू बांधवांवर होत असलेले हल्ले, मंदिरांची मोडतोड केली जात आहे. यादरम्यान बांगलादेशी सैन्यदलाने हिंदूंच्या रक्षणाचे आश्वासन दिले असले, तरी केंद्र शासनाने त्यांच्यावर अवलंबून न राहता हिंदू समाज व मंदिरांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे.
या दरम्यान बांगलादेशमधील हिंसेचा निषेध नोंदविण्यासाठी शुक्रवारी (ता.१६) जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला या बंदला नाशिकमधील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सनातन, हिंदू जनजागृती समिती, समविचारी संघटना राजकीय पक्ष म.न.से, भाजपा, हिंदू एकता आंदोलन पक्ष तसेच सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी पाठिंबा दिला. शहरातील एमजी रोड, मेन रोड, पंचवटी, नविन नाशिक, नाशिक रोड, सातपूरसह इतर भागात बंद पाळण्यात आला; तसेच नाशिकरोड परिसरातील सुभाष रोड, देवळाली गाव स्टेशन रोड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड, छत्रपती शिवाजी पुतळा चौक परिसर, बिटको चौक मुक्तिधाम परिसर, जेलरोड, सिन्नर फाटा येथेही बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.