Amazon

नाशिक: भरधाव मोटारसायकलने दिलेल्या धडकेत ६८ वर्षीय वृध्द ठार

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

नाशिक (प्रतिनिधी): भरधाव मोटारसायकलने दिलेल्या धडकेत ६८ वर्षीय वृध्द ठार झाले. हा अपघात विहीतगाव चौफुली भागात झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली अ्सून दुचाकीस्वार आपल्या वाहनासह पसार झाला आहे.

🔎 हे वाचलं का?:  दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांनो सावधान! नाशिकमध्ये ३३६ जणांवर कारवाई

लक्ष्मण नामदेव शिंदे (रा. हांडोरेमळा, विहीतगाव) असे मृत पादचा-याचे नाव आहे. शिंदे बुधवारी (दि.१४) विहीतगाव चौफुली भागातून रस्त्याने पायी जात असतांना हा अपघात झाला. भरधाव अज्ञात मोटारसायकलने त्यांना जोरदार धडक दिली.

या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने मुलगा दिलीप शिंदे यांनी त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता गुरूवारी उपचार सुरू असतांना डॉ. तुषार दंडोरे यांनी तपासून मृत घोषीत केले याबाबत अंमलदार नितीन गायकवाड यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार खैरे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790