नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
नाशिक: लाकडी दांडक्याने मारून पत्नीचा खून; शवविच्छेदनामुळे संशयित पतीचा बनाव उघड
नाशिक (प्रतिनिधी): पत्नी काम करताना पडल्याचे सांगत तिला सोमवारी (ता.२०) रात्री उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. मंगळवारी (ता. २१) सकाळी शवविच्छेदनातून मात्र तिचा खून करण्यात आल्याचे समोर येताच, गंगापूर पोलिसांनी शिवाजीनगर परिसरातून पोलिसांची दिशाभूल करून बनाव रचणाऱ्या मद्यपी पतीला बेड्या ठोकल्या.
पोलिसी खाक्या दाखविताच त्यानेही खुनाची कबुली दिली असून, याप्रकरणी गंगापूर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक: हृदय पिळवटून टाकणारी घटना; मुलांकडे लक्ष द्या, हौदात पडून चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
मीरा पिनू पवार (४०, रा. सातीआसरा, वीटभट्टीजवळ, पाझर तलाव, शिवाजीनगर, सातपूर. मूळ रा. सुरगाणा) असे मयत विवाहितेचे नाव आहे. तर, तिचा पती संशयित पिनू सोमनाथ पवार (४४) यास गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. २०) रात्री आठ वाजेच्या सुमारास संशयित पती पिनू व मीरा या दाम्पत्यांमध्ये वाद झाला. त्यावेळी मद्याच्या नशेतील पिनू याने मीरा यांना जबर मारहाण केली.
Nashik Crime: मोबाईलचा वाद भोवला, हातातील रबरी बँडवरून युवकाच्या खुनाचा उलगडा
फावड्याच्या दांडक्याने मारहाण करताना मीरा यांच्या डोक्याला, छातीला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली होती. त्यातच तिचा मृत्यु झाला होता. त्यानंतर संशयित पिनू याने तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी त्याने, ती काम करताना पडल्याने दुखापत झाल्याचे सांगितले. तर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी गंगापूर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंदही करण्यात आली.
दरम्यान, मंगळवारी (ता. २१) सकाळी मीरा यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असता, त्यातून धक्कादायक माहिती समोर आली. मीरा यांचा मृत्यु पडून नव्हे तर मारहाण केल्याने झाल्याचे निष्पन्न झाले. याबाबतची माहिती गंगापूर पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर गंगापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख यांच्यासह पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले आणि संशयित पती पिनू याला अटक केली. तसेच, घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी गंगापूर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक: साप चावला तरीही ती स्कुटीवर रुग्णालयात आली, मात्र; आईसमोर 17 वर्षीय मुलीचा मृत्यू
पवार दाम्पत्य मद्यपी:
सुरगाणा परिसरातून मोलमजुरीसाठी नाशिकमध्ये आलेल्या या पवार दाम्पत्याला दोन मुली व एक मुलगा आहे. दोन्ही मुलींचा विवाह झाला असून, लहान मुलासह पवार दाम्पत्य शिवाजीनगरच्या विटभट्टी परिसरात रहावयास होते. संशयित पिनू पवार हा मद्यपी होता तर त्याची पत्नी मयत मीरा हिलाही मद्याचे व्यसन होते. या पवार दाम्पत्यामध्ये सतत वाद होत असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
![]()


