नाशिक: लग्नाचे आमिष दाखवून तब्बल १० वर्षे अत्याचार; तीन वेळा गर्भपात..

नाशिक: लग्नाचे आमिष दाखवून तब्बल १० वर्षे अत्याचार; तीन वेळा गर्भपात..

नाशिक (प्रतिनिधी): लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर तब्बल १० वर्षे लैंगिक अत्याचार करून तीन वेळा गर्भपात करण्यास भाग पाडल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी,

की 30 वर्षीय पीडित महिलेस संशयित आरोपी गणेश राजाराम भोसले (वय 34, रा. महालक्ष्मी बंगलो, खोडेनगर, नाशिक) याने दि. 12 सप्टेंबर 2012 ते दि. 21 जानेवारी 2022 या कालावधीत वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिंहस्थ कुंभमेळा २०२७ : पुरातत्त्व संवर्धनाच्या कामांना गती देण्याचे डॉ. किरण कुलकर्णी यांचे निर्देश

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”9790,9786,9784″]

संशयित भोसले याने या महिलेला त्याच्या उपनगर येथील घरी, औरंगाबाद नाक्यावरील शिवगंगा हॉटेल, उपनगर येथील शालम् हॉटेल, इगतपुरी येथील मँगो रिसोर्ट, तपोवन मैदान अशोका मार्ग मैदान, आणि अशोका मार्ग येथील त्याच्या राहत्या घरी नेऊन वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर संशयित भोसले याने या महिलेला नकळत दारू पाजून तिचे न्यूड फोटो व व्हिडिओ काढून ते नातेवाईकांना सोशल मिडियावर व्हायरल करण्याच्या धमक्या दिल्या.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 10 ऑगस्ट रोजी आयोजन

तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर अश्‍लील चॅट करून जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. फिर्यादी महिलेचा विरोध असतानाही अनैसर्गिक संबंध ठेवून फिर्यादी यांचा लैंगिक छळ केला, तसेच फिर्यादी महिलेचा तीन वेळा जबरदस्तीने गर्भपात करून तिला व तिच्या कुटुंबीयांना जिवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या. दरम्यान या प्रकाराला कंटाळून महिलेने मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गणेश भोसले याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीवंत करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790