नाशिक: मौजमजेसाठी विद्यार्थी बनले Mobile Snatcher! मोबाईल खेचणाऱ्या चौघांना पकडले

नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशिक: मौजमजेसाठी विद्यार्थी बनले Mobile Snatcher! मोबाईल खेचणाऱ्या चौघांना पकडले

नाशिक (प्रतिनिधी): रस्त्याने पायी चालत मोबाईलवर बोलणाऱ्यांच्या हातातील मोबाईल दुचाकीवर येऊन बळजबरीने हिसकावून पोबारा करणाऱ्या चौघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने ही कामगिरी केली असून, सात गुन्ह्यांची उकल करून सुमारे साडेचार लाखांचे महागडे २२ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: जालना येथील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला नाशिकमध्ये अटक

दरम्यान, अटक केलेले चौघेही महाविद्यालयीन शिक्षण घेणारे तरुण असून, मोबाईल हिसकावून ते विकायचे आणि त्या पैशातून मौजमजा करायचे. त्यामुळे चौकशीतून आणखीही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.

चेतन निंबा परदेशी (रा. शांतिनगर, सिडको), शशिकांत सुरेश अंभोरे (रा. पौर्णिमा बस स्टॉपजवळ), विजय सुरेंद्र श्रीवास्तव (रा. जुने सिडको), निखिल अर्जुन विंचू (रा. पाथर्डी फाटा), अशी अटक केलेल्या चौघा संशयितांची नावे आहेत.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: हॉटेल गोळीबार प्रकरणी लोंढे टोळीचा फरार संशयित जेरबंद

नाशिक: साप चावला तरीही ती स्कुटीवर रुग्णालयात आली, मात्र; आईसमोर 17 वर्षीय मुलीचा मृत्यू

४ फेब्रुवारीला पाटील लेन परिसरातील मॅग्नम हॉस्पिटलसमोरून पायी जाणाऱ्या व्यक्तीच्या हातातून दुचाकीवरून आलेल्या तिघांनी मोबाईल हिसकावून नेला. या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखा युनिट एकचे पथक करीत असताना, वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ, महेश साळुंके यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चेतन, शशिकांत व विजय या तिघा संशयितांची ओळख पटली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: जमीन हडपून खंडणीची मागणी; लोंढे पिता-पुत्रासह पाचजणांवर गुन्हा

त्यानंतर उपनिरीक्षक विष्णू उगले, सहायक उपनिरीक्षक रवींद्र बागूल, प्रवीण वाघमारे, प्रवीण म्हसदे, शरद सोनवणे, नाझिमखान पठाण, संदीप भांड, प्रशांत मरकड, विशाल देवरे, मुक्तार शेख यांच्या पथकाने तिघांनाही सापळा रचून जेरबंद केले.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here