नाशिक: बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारला म्हणून कोयत्यानं हल्ला

नाशिकमध्ये नोकरी शोधताय ? इथे क्लिक करा !

नाशिक: बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारला म्हणून कोयत्यानं हल्ला

नाशिक (प्रतिनिधी): बहिणीची छेड का काढली याचा जाब विचारायला गेलेल्या भावास संशयिताने दोघा भावा-बहिणीला जीवे मारण्याची धमकी देत, धारदार कोयत्याने डोक्यात, पोटावर, उजव्या पायावर तसेच पार्श्वभागावर वार केले.

तसेच पिडीत तरुणी तिच्या भावाला सोडविण्यासाठी गेल्यामुळे तिच्याही उव्या हातावर तसेच डोक्यावर कोयत्याने वार करून भाऊ व बहिण दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक : सिंहस्थासाठी महावितरण सज्ज; चार नवीन उपकेंद्रांतून मिळणार अखंडित वीजपुरवठा

ही धक्कादायक घटना अंबड लिंकरोडवर घडली असून, या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाची बहिण रविवारी सायंकाळी बुरकुले हॉल, सिडको येथून पायी घरी जात असतांना संशयित विशाल देवरे याने तिची छेड काढून शिवीगाळ केली.

🔎 हे वाचलं का?:  ३० जूनपर्यंतच संधी! HSRP नंबर प्लेट अनिवार्य; १ जुलैपासून नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई

त्यामुळे पिडीत मुलीने घरी येऊन तिच्या भावाला घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे तिचा भाऊ हा संशयित विशाल देवरे यास जाब विचारण्यासाठी खंडोबा मंदिराजवळ मोरवाडी येथे गेला. त्यावेळी विशाल देवरे याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आणि त्याचे मित्र निलेश अहिरे, गौरव पेनमहाले, अनिकेत हुले, सुधीर अहिरे, सोनू लिहिणार यांनी मुलीच्या भावाला पकडून ठेवले. तर विशाल देवरे याने त्याच्या जवळील धारदार कोयता काढून त्याच्या डोक्यात, पोटावर, उजव्या पायावर आणि पार्श्व भागावर वार केले. यावेळी त्याची बहिण सोडविण्यासाठी गेली असता हल्लेखोरांनी तिच्याही उजव्या हातावर तसेच डोक्यावर कोयत्याने वार केले आणि दोघांनाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: 0084/2023)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790