नाशिक (प्रतिनिधी): बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन आठ लाखाची खंडणी वसूल केल्याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत एकास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी निलेश रमेशचंद्र अग्रवाल (रा. लॅमरोड, देवळाली कॅम्प) यांनी तक्रार दाखल केली आहे.
साई भक्तांसाठी आनंदाची बातमी! संस्थानच्या समितीने घेतला मोठा निर्णय
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिपाली वाघ, रवी वाघ (रा.दोघे गवळीवाडा,दे.कॅम्प) व गणेश (४० रा.भुसावळ) अशी संशयित खंडणीखोरांची नावे असून त्यातील रवी वाघ यास अटक करण्यात आली आहे.
संशयित आणि तक्रारदार एकमेकांचे परिचीत आहे. अग्रवाल यांचे संशयित वाघ दांम्पत्याच्या घरी येणे जाणे असल्याने ही घटना घडली. गेल्या शनिवारी (दि.८) तिघा संशयितांनी अग्रवाल यांना गाठून चाकूचा धाक दाखवून शिवीगाळ केली.
नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमधील प्रशिक्षणार्थी अग्निवीर जवानाचा उष्माघाताने मृत्यू
यावेळी संशयितांनी जीवे मारण्याची धमकी देत महिलेस वाईट कमेंट करतो का? तुला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून बदनामी करू अशी धमकी देत अग्रवाल यांच्याकडून आठ लाख रूपयांची रोकड उकळली. यानंतरही खंडणीची मागणी वाढल्याने अग्रवाल यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक पाडवी करीत आहेत.