NC

नाशिक: प्रॉपर्टीसाठी मुलाने केली आईच्या कपड्यांची जाळपोळ

नाशिक (प्रतिनिधी): प्रॉपर्टी नावावर करण्याच्या कारणातून आईच्या घराच्या खिडकीच्या काचा फोडून कपड्यांची जाळपोळ केल्याप्रकरणी मुलासह एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी शकुंतला दीपचंद दोंदे (वय 68, रा. शाकुंतल निवास, शिवाजी चौक, जुने सिडको) या दि. 7 मे रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घरी एकट्याच होत्या. त्यावेळी त्यांचा मुलगा संशयित प्रकाश दीपचंद दोंदे व शारदा दीपचंद दोंदे हे दोघे घराच्या पोर्चमध्ये आले. त्यांनी प्रॉपर्टीच्या वादातून शकुंतला दोंदे यांना दमदाटी व शिवीगाळ करून पोर्चमध्ये वाळत असलेले कपडे कशाच्या तरी सहाय्याने जाळले, तसेच घराच्या खिडकीच्या काचा फोडून नुकसान केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 1 मार्च रोजी विशेष मोहीमेचे आयोजन

या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मुलासह एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पावरा करीत आहेत.

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790