नाशिक: पोलीसदादा तुम्हीसुद्धा? बदल्यांसाठी पोलिसांचाच झोल, अशी झाली पोलखोल

नाशिक: पोलीसदादा तुम्हीसुद्धा? बदल्यांसाठी पोलिसांचाच झोल, अशी झाली पोलखोल

नाशिक (प्रतिनिधी): सरकारी नियमानुसार नोकरीतील रजा तसेच इच्छुक ठिकाणी बदलीसाठी सफरींग प्रमाणपत्र आवश्यक असते.

मात्र याचा गैरफायदा घेत जिल्हा रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनी बोगस प्रमाणपत्र देण्याच दुकानच थाटलं आहे.

आंतरजिल्हा बदली मिळावी यासाठी पोलिसांनी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र दिली असल्याच उघड झालं होतं.

या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

असा उघड झाला प्रकार:
पोलीस दलात सध्या बदल्यांचे वारे वाहत आहेत. आंतरजिल्हा बदली मिळावी यासाठी इच्छुक कर्मचाऱ्यांनी अर्ज केले होते. नाशिक जिह्यात इच्छुक असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा १८ मे २०२२ पूर्वी बदलीसाठी अर्ज केले होते. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात या अर्जाची तपासणी करत असताना वरिष्ठ लिपिकानी काळजीपूर्वक तपासणी न करता अर्जात खाडाखोड केल्याच दिसून आलं. या प्रकरणी आस्थापनेचे उपअधीक्षक खगेन्र्द टेंभेकर यांनी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

याप्रकरणी पोलिसांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक हिरा रवींद्र कनोज यांना अटक केली होती. सखोल चौकशी केली असता, यात जिल्हा शासकीय रुग्णालयातील कर्मचारी असल्याच उघड झालं होतं. रुग्णालयात लिफ्टमन म्हणून काम करणारा कांतीलाल गांगुर्डे याला पोलिसांनी अटक केली असून त्याला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अशी होते आंतरजिल्हा बदली:
प्रत्येकाला आपल्या जिल्ह्यात बदली मिळावी अशी अपेक्षा असते. मात्र नियामनुसार ते शक्य नाही. आंतरजिल्हा बदलीकारिता शासनाच्या काही नियम आणि अटींची पुर्तता करावी लागते. यात नातेवाईकांना गंभीर आजार किंवा शस्त्रक्रिया झाली असल्यास त्याला आंतरजिल्हा बदली दिली जाते. याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. यानंतर जिल्हात बदली दिली जाते.

बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र देणारी टोळी फक्त नाशिकमध्येच नसून राज्यात कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आता गरज आहे ती पोलिसांनी सखोल चौकशी करण्याची…!

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790