नाशिक: दुचाकीच्या अपघातात सात वर्षीय चिमुकली ठार

नाशिक: दुचाकीच्या अपघातात सात वर्षीय चिमुकली ठार

नाशिक (प्रतिनिधी): वाढोली फाटयाजवळ दुचाकीला दुसऱ्या वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या सात वर्षीय चिमुकली ठार झाली तर, दुचाकीचालक गंभीर जखमी झाला आहे. गायत्री गजानन कामडी (७, रा. बेलतगव्हाण, ता. जि. नाशिक) असे चिमुरडीचे नाव आहे.

🔎 हे वाचलं का?:  परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी 1 मे पासून मराठी भाषा आवश्यक- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

सागर सोमनाथ झोले (२४, रा. पेगलवाडी, त्र्यंबक) हे गेल्या बुधवारी (ता. १७) सकाळी नऊला नाशिककडे येत होते. त्यावेळी वाढोली फाट्याजवळ असता भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. जखमी दोघांना विशाल आचारी याने उपचारार्थ तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

मात्र उपचार सुरु असताना दुपारी दीडला गायत्रीचा मृत्यू झाला तर दुचाकीस्वार सागर उपचार घेत आहे. त्र्यंबकेश्वर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790