नाशिक: अन्न व औषध प्रशासन विभागाच्या छाप्यात 81 हजाराचा गुटखा जप्त

नाशिक: अन्न व औषध प्रशासन विभागाच्या छाप्यात 81 हजाराचा गुटखा जप्त

नाशिक (प्रतिनिधी): अन्न व औषध प्रशासन विभागाकडून गुरुवार (ता.१८) भद्रकाली परिसरात गुटख्याच्या गोडाऊनवर छापा मारण्यात आला. सरकारतर्फे विक्रीस प्रतिबंध असलेला विविध प्रकारचा सुगंधित पान मसाल्याचा सुमारे ८१ हजार २६८ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी 1 मे पासून मराठी भाषा आवश्यक- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

संशयित अफजल शेख आणि वैभव मोराडे भद्रकाली परिसरातील मे. के. के. ट्रेडर्स येथे मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित सुगंधित पान मसाल्याचा साठा करून विक्री करत होते. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागास माहिती मिळाली.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी अमित रासकर, ए. आर. दाभाडे यांनी त्या ठिकाणी छापा मारला. प्रतिबंधित पान मसाला विक्री केला जात असल्याचे आढळून आले. तेथील तपासणी केली असता मोठ्या प्रमाणावर साठा आढळून आला. त्यांनी कारवाई करत संपूर्ण साठा जप्त केला.

🔎 हे वाचलं का?:  TCS प्रकरण: फॉरेन फंडिंगचा संशय; एटीएस, ‘एनआयए’शी पत्रव्यवहार

अमित रासकर यांच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कायदेशीर बंदी असतानाही अजूनही अशा प्रकारे प्रतिबंधित सुगंधित पान मसाला आणि गुटखा विक्री होत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790