Amazon

नाशिक: कैऱ्या तोडताना विजेचा तीव्र धक्का लागल्याने युवकाचा मृत्यू

नाशिक: कैऱ्या तोडताना विजेचा तीव्र धक्का लागल्याने युवकाचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): कैऱ्या तोडण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना आज (दि. २४ मे) सकाळी ८ वाजेदरम्यान इंदिरा नगर येथील राजसारथी सोसायटीत घडली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणासोबत वृक्षसंवर्धनालाही प्राधान्य द्यावे- पालकमंत्री गिरीश महाजन

अनिरुद्ध अनिल धुमाळ (वय ३०) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

सदर युवक हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिरुद्ध धुमाळ आज सकाळी झाडावरील कैऱ्या तोडण्यासाठी आला होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: श्री साक्षी गणेश मंदिरात आज सामुदायिक अथर्वशीर्ष पठण

तो शिडीच्या सहाय्याने आंब्याच्या झाडावर चढला. झाडावर असताना त्याच्या हातातील लोखंडी पाईपचा स्पर्श झाडाजवळून गेलेल्या उच्चदाबाच्या विद्युत वहिनीला झाल्याने त्यास जोरदार विजेचा धक्का बसला. त्या धक्क्याने तो झाडावरून खाली फेकला गेला. त्यात त्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी इंदिरा नगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790