नाशिक: उपनगरचा सहायक पोलिस  निरीक्षक डगळे यास लाच घेताना अटक; सिव्हिलमध्ये कारवाई

नाशिक (प्रतिनिधी): उपनगर पोलीस ठाण्यात दाखल अपहरणाच्या गुन्ह्यात चार्जशीटमध्ये बदल करण्यासाठी २५ हजारांच्या लाचेची मागणी करून ७ हजारांची रक्कम स्वीकारताना सहायक पोलीस निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.

सागर डगळे असे लाचखोर सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव असून, जिल्हा रुग्णालयाच्या आवारात बुधवारी (ता. ३) सायंकाळी सदरची कारवाई करण्यात आली. दरम्यान, डगळे याची गेल्या २०२२ मध्ये सहायक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती झाली.

नाशिक: फोटोग्राफर्सना मारहाण करून आलिशान कारसह कॅमेरे पळवले

 अपहरणाच्या गुन्ह्यात संशयिताविरुद्ध सामान्य दोषारोपपत्र दाखल करण्याच्या मोबदल्यात त्याच्या भावाकडून 7 हजार रुपयांची लाच घेताना उपनगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) रंगेहाथ पकडले. सन 2022 मध्ये या अधिकाऱ्याला एपीआयपदी पदोन्नती मिळाली होती. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विशेष सुरक्षा विभागाच्या निवड यादीत त्याचा समावेश होता.

⚡ हे ही वाचा:  नाशिक महापालिकेची अतिक्रमणाविरुद्ध मोहीम आजपासून पुन्हा सुरू...

नाशिकच्या शालिमार भागात अतिक्रमणांचा विळखा सैल, महापालिकेकडून दुकाने जमीनदोस्त

सागर गंगाराम डगळे असे लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. उपनगर येथे 24 वर्षीय तरुणाविरोधात नात्यातीलच 16 वर्षीय मुलीचे प्रेमसंबंधातून अपहरण केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्यानुसार उपनगर पोलिसांनी जळगाव येथून संशयिताला अटक होती. आता तो जामिनावर असून, त्याच्याविरोधात कठोर दोषारोपपत्र दाखल करणार नाही आणि गुन्ह्यात मदत करतो, असे सांगून डगळे, याने संशयिताच्या भावाकडे 25 हजारांची लाच मागितली. मात्र, तक्रारदार आणि संशयिताचा भाऊ खासगी ड्रायव्हर असून, आर्थिक परिस्थिती नसल्याने डगळे याला लाचेचे 2 हजार रुपये पूर्वी फोन पे केले.

⚡ हे ही वाचा:  नाशिकमध्ये जोरदार पावसाची हजेरी; तीन तासांत १०.४ मिमी पावसाची नोंद, आज (दि. २६) यलो अलर्ट कायम

नाशिकमध्ये गुन्हेगारीचा कळस; नाश्ता केला, पैसे मागितले तर स्वीट्स मालकाला मारहाण.. Video

दरम्यान, उर्वरित 23 हजार रुपये उकळण्यासाठी डगळे याने सतत संपर्क केला. त्यानुसार ठरला. त्यानुसार डगळे याने सात हजारांची लाच घेण्यासाठी संशयिताच्या भावाला नाशिक रोड रेल्वे स्टेशन आणि पुणे रोडवर बोलावून घेतले. तत्पूर्वी त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ डगळे याने लाच स्वीकारली असता त्याला पकडण्यात आले. एसीबीच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहळदे, सूचनेवरून पोलीस निरीक्षक अनिल बागूल आणि पथकाने ही कारवाई केली.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here