नाशिक: उद्योग भवनजवळ रिक्षावर झाड पडून दोन जणांचा मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात रिक्षावर झाड पडल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
शनिवारी (दि. ११ जून) सकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
नाशिकच्या उद्योग भवन जवळ रिक्षावर झाड पडल्याने दोन जणांचा मृत्यू झालाय. रिक्षा चालक आणि एक महिला प्रवासी या दोघांचा यात मृत्यू झालाय. ही रिक्षा शहरातून सातपूरकडे निघाली होती. चालू रिक्षावर हे झाड पडल्याने दोघांनाही जीव वाचावता आला नाही. मान्सूनपूर्व काम पूर्ण न केल्याने हा अपघात घडला असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. शहरातील धोकादायक झाडं तोडण्याची मागणी नागरिकांनी केलीये.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
मस्त रे.. नाशिकला पिता-पुत्रासह सुनबाई एकाच वेळी बारावी पास !
नाशिक: हुंड्यासाठी वारंवार होणाऱ्या छळामुळे विवाहितेची आत्महत्या; तीन जणांवर गुन्हा दाखल
नाशिक: हृदयद्रावक… रुग्णवाहिका चालकावर मुलाचाच मृतदेह वाहण्याची वेळ
![]()


