नाशिक: आंतरजातीय विवाह केल्याने युवकाला बेदम मारहाण

नाशिक: आंतरजातीय विवाह केल्याने युवकाला बेदम मारहाण

नाशिक (प्रतिनिधी): आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणावरून मुलीच्या नातलगांनी युवकाला नाशिकच्या संभाजी स्टेडियमसमोर बेदम मारहाण करीत दमदाटी केली.

सागर बाळासाहेब पे (२९, रा. सुतारलेन, ता. निफाड, जि. नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, सागर यांनी गेल्या ११ एप्रिल २०२१ रोजी कांचन हिच्याशी आंतरजातीय विवाह केला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मुंबई-धुळे मार्गिका खुली, उर्वरित काम १५ ऑक्टोबरपर्यंत; द्वारका जंक्शनवरील वाहतुकीला दिलासा

या कारणावरून संशयित अनिल रंगनाथ कुंदे (४५), कृष्णा सदाशिव धारराव (३५), अजित विजय धारराव (२८), योगेश चंद्रकांत कर्डिले (३५), किरण बाजीराव कापसे (४०, सर्व रा. निफाड, जि. नाशिक) यांनी सागर यांना अंबड परिसरातील संभाजी स्टेडियमसमोर असलेल्या सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये बेदम मारहाण केली.

🔎 हे वाचलं का?:  राज्य नाट्य स्पर्धेंसाठी संस्थांनी 25 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन

सागर व कांचन या दाम्पत्याला शिवीगाळ करीत “तुझ्या घरच्यांना निफाडमध्ये कोण ठेवतो”, असा दमही दिला. या प्रकरणी अंबड पोलिसात संशयितांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक निरीक्षक कोल्हे तपास करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790