NC

नाशिक: अनैतिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या महिलेच्या मुलाला दिले सिगारेटचे चटके

नाशिक: अनैतिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या महिलेच्या दोन वर्षाच्या मुलाला दिले सिगारेटचे चटके

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमध्ये हृदय पिळवटून टाकणारी आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे.

महिलेने शारीरिक संबंधाला नकार दिल्याने तिच्या दोन वर्षाच्या मुलाला अमानुष मारहाण केल्याची घटना नाशिकच्या देवळाली गाव परिसरात घडली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शेअर मार्केटमध्ये ‘जादा परताव्याचे’ आमिष; तिघांना तब्बल ९० लाखांचा ऑनलाइन गंडा

मुलाला फक्त मारहाणच नाही तर त्याला सिगारेटचे चटके सुद्धा देण्यात आले आहेत.

याप्रकरणी मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार नाशिकरोड पोलीस ठाण्यात बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित बाबासाहेब भगवान कपाटे (वय ३०) रा. अंधारी पळशी. ता. सिल्लोड, जि औरंगाबाद; हल्ली रा. रमाबाई. आंबेडकर नगर, गुलाबवाडी, मालधक्का रोड,  देवळाली गाव येथे रहातो. पीडित महिला हिला बाबासाहेब याने ‘मला तुझ्यापासून मुलबाळ होऊ दे’, अशी मागणी केली होती. मात्र विवाहित महिलेने नकार दिल्याने बाबासाहेब याने महिलेच्या दोन वर्षाच्या चिमुरड्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच मुलाच्या शरीरावर वेळोवेळी ठिकठिकाणी सिगारेटचे चटके दिल्याचा प्रकार घडला आहे.

🔎 हे वाचलं का?:  चौथे विश्व मराठी संमेलन: कृत्रिम बुद्धिमतेच्या माध्यमातून मराठी भाषेत ज्ञान, सेवा व विविध क्षेत्रात संधी उपलब्ध होणार- संतोष साळवी

मुलाचा छळ होऊ लागल्याने महिलेने पोलिसात धाव घेतली आणि घडलेली सर्व घटना पोलिसांना सांगितली. पोलिसांनी बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमांतर्गत बाबासाहेब कपाटे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790