Amazon

नाशिकच्या एमजी रोडवर शिवसेना पदाधिकारी निलेश उर्फ बाळा कोकणे यांच्यावर हल्ला

नाशिकच्या एमजी रोडवर शिवसेना पदाधिकारी बा बाळा कोकणे यांच्यावर हल्ला

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे.

शहरातील एम जी रोडवरील यशवंत व्यायाम शाळेजवळ ही घटना घडली आहे.

अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने शिवसेना पदाधिकारी निलेश उर्फ बाळा कोकणे याच्यावर हल्ला केला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पोलीस असल्याची बतावणी करत दोन तोळ्यांच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास

त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अधिक माहिती अशी की, निलेश उर्फ बाळा कोकणे हे रात्रीच्या सुमारास त्यांच्या दुचाकीने एम जी रोड परिसरातून जात होते. याच वेळी एमजी रोडवरील यशवंत व्यायामशाळा परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर व पाठीवर वार केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पत्नीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी डॉ. नीलेश जेजुरकर पोलिसांच्या ताब्यात

या हल्ल्यात कोकणे हे गंभीर जखमी झाले आहेत. हल्ला केल्यानंतर अज्ञात हल्लेखोर फरार झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाळा कोकणे यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेच्या ठिकाणी पोलिसांनी भेट दिली असून भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोकणे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांचा तपास सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790