
धक्कादायक, नाशिकला गीतांजली एक्सप्रेसखाली उडी घेत मायलेकींची आत्महत्या…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरासह जिल्ह्यात आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असून दररोज तीन ते चार आत्महत्या उघडकीस येत आहेत.
देवळाली कॅम्प येथील दोघा मायलेकींनी रेल्वे पुढे झोकून देत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
देवळाली कँम्प बार्नस्कूल जवळ राहणाऱ्या अनिता शिरोळे (वय: ४२) व राखी शिरोळे (वय: २२) या माय लेकीने रेल्वेखाली उडी घेत जीवन संपविले आहे.
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. देवळाली कॅम्प येथील बार्नस्कूल जवळील मल्हारीबाबा येथे शिरोळे कुटुंब वास्तव्यास आहे.
- नाशिक: काळजाचा थरकाप उडवणारा Video; वळूने वृद्धाला जमिनीवर आपटलं आणि…
- नाशिक: प्रेमसंबंधांवरून वीस वर्षीय तरुणाची हत्या; तीन सख्ख्या चुलत भावंडांना अटक
अनिता शिरोळे यांचे पती बाळासाहेब शिरोळे हे रेल्वे प्रशासनाचे ठेकेदार म्हणून काम पाहतात. ते कामानिमित्त सोलापूर येथे गेले असल्याने या दोघीच मायलेकी घरी होत्या. या दोघीनी अचानकपणे घरापासून काही अंतरावर असलेल्या पाळदे मळा येथील मुंबईहून-नाशिकरोड कडे येणार रेलवेमार्ग गाठला.
दरम्यान डाऊन लाईनवरून नाशिककडे भरधाव येणाऱ्या गीतांजली एक्सप्रेसपुढे दोघींनी स्वतःला झोकून दिले. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. रविवारी सकाळच्या अकरा वाजेपूर्वीच रेल्वे मार्गावर आत्महत्या केली असल्याचे पोलीसांनी सांगितले. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नसून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आत्महत्येचे कारण ?:
शिरोळे कुटुंबियातील राखी ही महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. त्यांची मोठी मुलगी विवाहित आहे. तर अनिता शिरोळे आणि राखी शिरोळे या दोघीच घरी होत्या. या मायलेकीने नेमके असे पाऊल का उचलले? याचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790