गंजमाळ परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी व दगडफेक; परिस्थिती नियंत्रणात
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या गंजमाळ परिसरात काल (दि. २१ ऑगस्ट) रात्रीच्या सुमारास दोन गटात तुफान राडा झाला.
एकमेकांवर दगडफेक केल्याने काही वेळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दगडफेकीची घटना आणि रस्त्यावर जमलेल्या गर्दीने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.
घटनेची माहिती भद्रकाली पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तासाभराच्या प्रयत्नानंतर परिस्थिती नियंत्रणात आणली गेली. दरम्यान दोन्ही गटातील नागरिकांनी परस्पर विरोधी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. त्यामुळे काही वेळ पोलीस ठाण्यात देखील तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. किरकोळ कारणावरून दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीने यांनी दगडफेकीचे दगडफेकीत रूपांतर झाले. त्यामुळे गंजामाळ सह परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त तांबे, संजय बारकुंड, सहाय्यक आयुक्त दिपाली खन्ना यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी भद्रकाली पोलीस ठाणे गाठले होते.
यापूर्वीही परिसरात अशा प्रकारचा वाद झाला आहे. वारंवार होणाऱ्या अशा घटनांना आळा बसावा, यासाठी पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी. असे मागणी नागरिकांनी केली आहे.
![]()
